व्यापारासाठी अमेरिकेचे भारताला झुकते माप

03 Feb 2025 17:36:19
 

वॉशिंग्टन - 'अमेरिका फर्स्टया धोरणानुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोकॅनडा आणि चीन या तिन्ही देशांवर प्रचंड प्रमाणात आयात कर लावण्याची घोषणा केली असूनभारताला मात्र यातून वगळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील मैत्रीचा हा परिणाम  असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सशक्त पर्याय म्हणून पुढे येण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त झाली आहे.

भारताला कोणता लाभ होणार?

अमेरिकेचा मेक्सिकोकॅनडा आणि चीन यांच्यासोबतचा व्यापार या आयात करामुळे महाग होत जाणार हे स्पष्टच आहे. अर्थातच  यामुळे  भारतासारख्या उभरत्या बाजारपेठेला अमेरिकेबरोबरच्या व्यापारात समर्थ पर्याय म्हणून मोठी संधी मिळू शकते. कारण या देशांच्या तुलनेत भारतीय उत्पादने अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होतील. यातून भारतातील विविध स्वरूपाच्या उद्योगांना निर्यातीसाठी आणखी मोठी संधी मिळू शकते. त्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास होईल.

 अमेरिका हा सध्याच्या घडीला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताची निर्यात ७७.५१ अब्ज डॉलर होतीतर आयात एकूण ४२.२ अब्ज डॉलर होती. व्यावसायिकवैज्ञानिक आणि तांत्रिक सेवाउत्पादन आणि आयटी यांसारख्या अमेरिकन व्यवसायांसाठीही भारत हे प्रमुख ठिकाण आहेहेही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहे.


पुढारी ३.२.२५

Powered By Sangraha 9.0