जळगाव येथील संदलमध्ये औरंगजेबाचा फलक लावला

04 Feb 2025 16:35:29
 

     जळगाव - शहरातील तांबापुरा भागातून मुसलमान समुदायाची संदल (मिरवणूक) २४ जानेवारी या दिवशी काढण्यात आली. यात 'डॉल्बी'चा वापर करण्यात आला होता. संदलमध्ये हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि छत्रपती शंभूराजे यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचा फलक जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या हेतूने लावण्यात आला होता.

     तसेच शहरातील डी मार्ट चौकात  एम्.आय.एम्.चे ('ऑल इंडिया मजेलिस ए इत्तेहादुल मुसलीमीन'चे) अकबरुद्दीन ओवैसी यांचा '१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा', याविषयीचा चिथावणी देणारा संवाद 'डॉल्बी'वरून जाणीवपूर्वक लावण्यात आला होता. याप्रकरणी हिंदू संतप्त झाले असून ५ दिवसंनातरही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.

      अशाच प्रकारे ,काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वाघोदा, रावेर येथे काढलेल्या संदलमध्ये धर्मवीर संभाजीराजे यांची क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे फलक हेतूपुरस्सर पकडण्यात आले होते, तसेच ओवैसी बंधूंचे '१५ मिनिटे' असे लिहिलेले फलक धरण्यात आले होते. त्या वेळी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सनातन प्रभात ३०.१.२५

Powered By Sangraha 9.0