बारामती- बारामती कृषी बाजारात एका विक्रेत्याला रेशीम कोषाला ७७० रुपये किलो इतका चढा भाव मिळाला. बाजारात ४४५ किलो रेशीम कोषांची आवक झाली. कमीतकमी किंमत ४५० रुपये किलो होती तर सरासरी ७२० रुपये भावाने विक्री झाली. वर्गीकरण आणि स्वच्छ केलेल्या रेशीम कोषांना चांगली किंमत मिळते. बारामती रेशीम बाजारात ई-नाम प्रणाली असल्याने विक्री व्यवस्था चांगली आहे.
नवभारत ४.२.२५