भारतापासून १५ हजार किलोमीटरवर आहे 'मिनी बिहार' !

06 Feb 2025 17:35:54
 

लंडन वेगवेगळ्या कारणांमुळे शे-दोनशे वर्षांपूर्वीच्या काळात भारताच्या विविध भागांतून अनेक लोक परदेशात गेले व सध्या तिथे त्यांची संख्या आणि प्रभाव मोठाच आहे. अशाच प्रकारे दक्षिण अमेरिका खंडातील एका देशात बिहारी लोक मोठ्या संख्येने आहेत. भारतापासून १५ हजार किलोमीटरवरील या देशाला अनेकजण 'मिनी बिहारअसेच म्हणतात; या देशाचे नाव आहे सूरीनाम.

सुमारे १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी शेकडो भारतीयांना ऊसाच्या शेतात मजुरीसाठी  सूरीनामला  पाठवले होते. हे मजूर प्रामुख्याने बिहार व उत्तर प्रदेशचे होते. त्यांनी आपल्याबरोबर भोजपुरी भाषाभारतीय संस्कृती आणि परंपराही नेल्या. सध्या सूरीनामच्या एकूण लोकसंख्येचा  ३० टक्के भाग भारतीय वशांच्या लोकांचा आहे. ते हिंदी भाषा बोलतात. त्यांच्या आहारात वरण-भातरोटी-भाजीलोणचेचटणी असे अस्सल भारतीय पदार्थ आहेत. त्यांच्या लग्नसमारंभात व सणाच्या वेळी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते.

दिवाळी, होलीछठपूजेसारखे अनेक सण ते उत्साहात साजरे करतात. विशेष म्हणजे संस्कृत भाषेतून शपथ घेतलेले सूरीनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोली हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत.


पुढारी ६.२.२५

Powered By Sangraha 9.0