तांब्या आणि फुलपात्रातून मिळणार पाणी

06 Feb 2025 10:38:51
 

पुणे, ता. ४: प्लॅस्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने अभिनव निर्णय घेतला आहे. नगर रस्ता (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयात बैठकीच्या वेळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तहान आता तांब्या आणि फुलपात्रातील पाणी भागवणार आहे. क्षेत्रीय कार्यालयात यापुढे पाण्याची प्लॅस्टिकची बाटली देण्यात येणार नाही, तसा निर्णय क्षेत्रीय कार्यालयाने घेतला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध पातळ्ळ्यांवर उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्लॅस्टिकमुक्त परिसराची सुरुवात नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातून करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले आहे. त्यानुसार सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त संजय पोळ यांनी हा निर्णय घेतला. या उपक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे. त्यासाठी तांब्या आणि फुलपात्रांचा मोठा संच खरेदी करण्यात आला. क्षेत्रीय कार्यालयात

नागरिकांना प्लॅस्टिक वापरू नका, असे आवाहन करण्याअगोदर आपल्या कार्यालयातून त्याची अंमलबजावणी व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 'आधी केले आणि मग सांगितले' असा संदेश त्यातून मिळेल आणि प्लॅस्टिक वापरण्याचे प्रमाण कमी होईल. असे संजय पोळ, सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त यांनी म्हटले आहे.


सकाळ ५.२.२५

Powered By Sangraha 9.0