तिरुपती मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवले

07 Feb 2025 14:35:34
 
      हैदराबाद- तिरुमला तिरुपती देवस्थान समितीने मंदिरात कार्यरत हिंदू नसलेल्या १८ कर्मचाऱ्यांना हटवले आहे. त्यांच्यासमोर राज्य सरकारच्या अन्य विभागात नोकरी अथवा स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवण्यात आला आहे. 
काही महिन्यापूर्वी चंद्राबाबू नायडूंनी या मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये वाय.एस.आर.सरकारच्या काळात शुद्ध तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप केला होता. य आरोपामुळे खळबळ माजली होती. तिरुपती देवस्थानचा समावेश जगातल्या श्रीमंत मंदिरांमध्ये होतो.

पुढारी ६.२.२५
Powered By Sangraha 9.0