संभलमधील हिंदू समाजाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडे अल्पसंख्याक दर्जा आणि संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि परिस्थितीची माहिती सरकारला देण्याचे आश्वासन दिले. हिंदूंची कमी होत जाणारी लोकसंख्या आणि असुरक्षिततेची समस्या लोकांनी निदर्शनास आणून दिली. 'संभलमध्ये हिंदूंना अल्पसंख्याकांचे हक्क द्या, हिंदूंवरील अत्याचार थांबवा आणि आम्ही हिंदू असल्याने आम्हाला अल्पसंख्याक म्हणून मान्यता द्या', अश्या घोषणाही हिंदू समाजाने दिल्या. १९७८ पूर्वी संभलमध्ये ४० टक्के हिंदू लोकसंख्या होती, परंतु दंगलींच्या आगीत संभल वारंवार जाळले गेल्यानंतर आणि हिंदूंच्या हत्याकांडामुळे हिंदू लोकसंख्या कमी होत राहिल्याने त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले. आता शहरातील हिंदू लोकसंख्या केवळ १५ टक्के आहे आणि तीही असुरक्षित आहे. त्यामुळे संभलच्या हिंदूंना अल्पसंख्याक हक्क मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवभारत ०८/०२/२५