'गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ... जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ' हे ब्रीद वाक्य घेऊन या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या मातीत खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांना पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. कौशल्य विकास विभाग आणि पुणे येथील क्रीडा भारती या संस्थेच्या सहयोगाने या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ'
या स्पर्धेत कब्बडी आणि खो-खो हे जागतिक दर्जाचे खेळ आहेत. त्याचबरोबर लगोरी, लेझीम, लंगडी, विटी-दांडूसह १२ पारंपरिक खेळांचा समावेश या क्रीडा महाकुंभात करण्यात आला आहे. रविवार (ता. २) आणि सोमवारी (ता. ३) आयटीआय स्तरावर, ४ आणि ५ मार्च रोजी जिल्हा स्तरावर तर ७ ते ९ मार्चपर्यंत नाशिक विभागीय स्तरावर ह्या क्रीडा कुंभाची सांगता होईल. विजेत्यांना आकर्षक पारितोषिक तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार आणि नावीन्यता विभागाकडून क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. २) पासून ९ मार्चपर्यंत हा क्रीडा कुंभ राज्यात सुरू राहणार आहे.