लातूर जिल्ह्यातील तूरडाळ आता ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि दुबईपर्यंत पोहोचली आहे ! याची कोट्यवधीची उलाढाल होत असून तूरडाळीचे दर ८,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
लातूरला 'डाळीचे भांडार' म्हणून ओळखले जाते. येथे तयार होणारी तुरीची डाळ उत्कृष्ट दर्जाची असते. त्यामुळेच तिला आंतरराष्ट्रीय बाजारातही नाव मिळते आहे.
याचा फायदा तेथील शेतकऱ्यांना होत असून तिथल्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ झाली आहे.
योग्य धोरण, वाहतूक सुविधा, सहज व्यापार धोरण यामुळे लातूर जिल्ह्याचा कृषी तसेच व्यापार क्षेत्रातील दबदबा वाढतो आहे आणि परिणामी याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे.
देवगिरी प्रवाह २६.२.२५.