भारत-चीन राजनैतिक चर्चा

बीजिंगमध्ये भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चा; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Vartapatra    30-Mar-2025
Total Views |

sanskrutik vartapatra_india-china-political-talks-border-management-2025 
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यादरम्यान नुकतीच बीजिंग येथे राजनैतिक पातळीवर चर्चा झाली.(India-China-political-talks-border-management-2025) सीमा व्यवस्थापन आणि, सीमेवरील सहकार्य, नदी पाणीवाटप आणि कैलास मानसरोवर यात्रा या मुद्द्यांवर चर्चेत भर देण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सल्ला आणि सहकार्याबाबतच्या कृती यंत्रणा गटामध्ये झालेल्या या बैठकीत मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी पातळीवरील बैठकीत निश्चित केलेल्या मुद्द्यांवर अंमलबजावणीबाबतही चर्चा झाली.

सकाळ २६.३.२५