भारत-बांगलादेश सीमा सुरक्षेवर गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मोठे वक्तव्य केले आहे.
प.बंगालमधील सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी बांगलादेश सीमा बंद करण्यासाठी अडचण निर्माण केली. ते सीमारक्षकांसोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न करत होते. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्या धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे. आमच्या हद्दीत तार कंपाऊंड करू नका, आम्ही तार कंपाऊंड करण्यासाठी कोणतीही एक परवानगी देणार नाही, असे ममता सरकारने सांगितल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत वक्तव्य केले. २७ मार्च २०२५ मध्ये लोकसभेत इमिग्रेशन अँड ओव्हरसीज बोर्डावर बोलताना बांगलादेश सीमेचा हा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, नदी, नाले आणि धरणांमुळे या भागाला कुंपण घालता येत नाही. मला वाटते की ४५० किमी अजून शिल्लक आहे. गृह सचिवांनी बंगालच्या सचिवांसोबत ४५० किमीसाठी एकूण ७ बैठका घेतलेल्या आहेत, पण प.बंगालचे सरकार जमीन देण्यास तयार होत नाही..
मुंबई तरुण भारत २८/०३/२५