छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुकमामध्ये सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये १६ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. या कारवाईत दोन जवान देखील जखमी झाले आहे.
सुकमा एसपी किरण चव्हाण यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, सुकमा-दंतेवाडा सीमेवरील उपमपल्ली केरळ पाल परिसरातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले आहे. नक्षलवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीबाबत, बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले आहे की, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. याशिवाय, या यशस्वी कारवाईत दोन सैनिक किरकोळ जखमी झाले.
ईटीव्ही भारत २९/०३/२५