द.भारतातील रामकथांची साहित्यसृष्टी

05 Mar 2025 16:37:07
 
         दक्षिण भारत ही भक्तीची जननी मानली जाते. या भूमीत वैष्णव भक्तभागवत आळवार संतांनी रामभक्तीने, राम गीताने भक्ती आंदोलनाचा हलकल्लोळ केला. या पार्श्वभूमीवर आपण आज कविचक्रवर्ती कम्बन याच्या 'कंब रामायणा' बद्दल जाणून घेऊ.
         कवी कम्बन यांचा जन्म नवव्या शतकात चोल राजवटीत 'तिरुवलुंदर' गावी झाला. त्यांनी अगदी लहान वयातच आपल्या वडिलांकडून विविध ग्रंथांचा अभ्यास केला. नम्माळवार संतांच्या प्रेरणेने आणि वडिलांच्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनाने कम्बन यांनी रामायण लिहिण्याचा शुभ संकल्प केला. त्यांची प्रतिभा अदभूत होती, त्यामुळे केवळ पाच वर्षाच्या अवधीत त्यांनी दहा हजार ओळी, १२३ अध्याय अर्थात पादम् असे सहा कांडांचे रामायण पूर्ण केले. 
        कवी कम्बन यांचे 'रामावताराम्' हे सर्वश्रेष्ठ तामिळ रामायण म्हणून गणले गेले. सर्वांनी त्याची प्रशंसा केली तसेच 'तामिळ शारदेचा कौस्तुभमणी' असे त्यास अढळस्थान लाभलेले आहे. यासाठी कम्बन् यांचा 'कविचक्रवर्ती' म्हणून सन्मान करण्यात आला. 
  मुं.त.भा २३.२.२५   
Powered By Sangraha 9.0