पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा समोर आला आहे. राम मंदिर उडवून देण्याचा पाकिस्तानचा डाव सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. हरियाणातील फरिदाबाद येथील संशयित अब्दुल रहमानच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अब्दुल रहमानच्या माध्यमातून राम मंदिरावर हल्ला करण्याची योजना आखत होती. यासाठी आयएसआयने अब्दुल रहमानला तयार केले होते.
अयोध्या राम मंदिरावर हँड ग्रेनेड वापरुन हल्ला करुन मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणण्याचा
राम मंदिर उडवण्याचा कटदरम्यान, अब्दुल रहमान हा आयएसआयच्या संपर्कात होता. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी अब्दुल हा अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. अब्दुल रहमान फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवतो. तो व्यवसायाने ऑटो चालक देखील आहे. बांधकामापासून राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. तथापि, अब्दुलला अटक करुन तपास यंत्रणांनी आयएसआयचा एक मोठा कट उधळून लावला.
'तो' आयएसआयच्या संपर्कात होता दहशतवादी अब्दुल रहमानचा कट होता. कटाचा एक भाग म्हणून अब्दुलने अनेक वेळा राम मंदिराची रेकी केली होती. विशेष म्हणजे, त्याने सर्व माहिती आयएसआयलाही पाठवली होती. अब्दुल पहिल्यांदा फैजाबादहून ट्रेनने फरिदाबादला पोहोचला होता. जिथे त्याला एका हँडलरने हँडग्रेनेड दिले. ते घेऊन ट्रेनने अयोध्येला जाण्याचा त्याचा बेत होता. तथापि, योजना यशस्वी होण्यापूर्वीच केंद्रीय एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुजरात एटीएस आणि फरीदाबाद एसटीएफने संशयित दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या.
गोमंतक ३.३.२५