भाजपचे संसद प्रवक्ते निशिकांत दुबे यांनी झारखंडमध्ये होणाऱ्या बांगलादेशी घुसखोरीसंबंधी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, " झारखंडच्या संथाल परगण्यातील आदिवासींची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये ४५ % वरून २८% इतकी कमी झाली आहे तर येथील मुसलमानांची संख्या ९% वरून २४ % इतकी वाढली आहे. ही वाढ बांगलादेशातील मुसलमान इथे आल्यामुळे झाली आहे हे स्पष्ट दिसून येते आहे."
असेही दिसून येते की झारखंडमधील कित्येक शाळांमध्ये आता उर्दू शिकवले जाते आणि शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी देण्यात येते !
दुबे यांचे असे मत आहे की जर केंद्र सरकारने यावर वेळीच उपाय केला नाही तर झारखंड बांगलादेशात जाण्यास वेळ लागणार नाही !
सोर्स : पांचजन्य