अकरा माओवादी पोलिसांना शरण

09 Mar 2025 17:35:56
 
: सात महिलांसह ११ माओवाद्यांनी शुक्रवारी     नारायणपूर        आत्मसमर्पण   केल्याचे नारायणपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रभातकुमार यांनी सांगितले. छत्तीसगडमधील या माओवाद्यांवर ४० लाख रुपयांचे बक्षीस होते. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा दल आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभावित होऊन आत्मसमर्पण केल्याचे या वेळी सांगण्यात आले. 
               आत्मसमर्पण केलेले सर्व जण माओवाद्यांच्या उत्तर बस्तर आणि माड विभागात वेगवेगळ्या पदांवर सक्रिय होते. आत्मसमर्पण केलेल्या सर्वांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुढील पुनर्वसन करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.
महाराष्ट्र टाईम्स ८.३.२५
Powered By Sangraha 9.0