नाशिकमध्ये 'पीएम किसान'चे बांगलादेशी लाभार्थी

09 Mar 2025 14:35:55
 
नाशिक : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) लाभ दिला जातो. मात्र या योजनेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भादवण (ता. कळवण) येथील पात्र लाभार्थ्यांच्या यादीत १८१ बोगस बांगलादेशी असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर बोगस लाभार्थ्यांची नावे असलेली यादी सादर केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

भादवण गावात एकही मुस्लिम रहिवासी व खातेदार नाही. असे असताना पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी यादीत १८१ मुस्लिम व्यक्तींची नावे असल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र ते ते नेमके कुठले आहेत? हे
पैसे कुठल्या खात्यावर गेले? हे चौकशीअंती समोर येणार आहे. भादवण गावात एकही मुस्लिम नसताना व ही नावे योजनेत बसविण्यात आल्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माजी खासदार सोमय्या यांना कळवले होते. त्यानंतर गेल्या आठ दिवसांत चौकशी केल्यानंतर या आासला असता, ११८१ लोकांचा बँक तपशील तपासला संबंधित पश्चिम बंगालमधील बांगलादेश सीमेवरील असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नावे कशी नोंदवली? बँक खाते कसे उघडले? कोणते व्यवहार झाले? या बाबत चौकशी करण्याची मागणी पोलिस यंत्रणेकडे केली आहे. वेळ पडल्यास केंद्र सरकारची मदत घेऊ. येथील ग्रामस्थांमुळे हे प्रकरण समोर आले; इतर ठिकाणी काय याची माहिती घेऊ, असे सोमय्या म्हणाले.

अॅग्रोवन ०८/०२/२५
Powered By Sangraha 9.0