हजारीबाग : झारखंडच्या हजारीबागमध्ये रामनवमी मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला.
यावेळी दोन्ही गटांकडून दगडफेक झाली असून, पोलिसांनी हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेतील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दगडफेकीच्या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र, धार्मिक गीते लावण्यावरून दोन गटांत वाद झाला त्याचे पर्यावसान दगडफेकीत झाले, असा दावा स्थानिकांनी केला.
सकाळ २७.३.२५