जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमक; ५ दहशतवादी ठार

02 Apr 2025 14:06:09

jammu-kashmir-kathua-encounter-5-terrorists_sanskrutik vartapatra.jpg
जम्मू-काश्मीर मधील कठुआमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (एसओजी) चार जवान शहीद झाले. या कारवाईत डेप्युटी एसपी बॉर्डर धीरज कटोच आणि लष्कराच्या पॅरा कमांडोसह ७ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना जम्मू शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांविरोधात पुन्हा कारवाई सुरू केली. जोरदार गोळीबार आणि स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले.

नवभारत २९/०३/२५ 
Powered By Sangraha 9.0