पंडित नेहरूंनी पाकिस्तानविषयीच्या कळवळ्यातून केलेल्या आणि आपल्या देशाचं नुकसान करणाऱ्या 'सिंधू वाटप कराराला' काल पंतप्रधान मोदींनी स्थगिती दिली. 'Terrorism and treaty cannot go together' अशी पंतप्रधान मोदींची भूमिका आहे.
३१८० किमी लांबीची ही सिंधू फाळणीनंतर बहुतांशी पाकिस्तानात गेली असली तरी आजही या नदीचा ९०० किमीचा प्रवाह भारतातून वाहतो हे अनेकांना माहीत नाही. पाकिस्तानचे अस्तित्व सिंधू नदीवर अवलंबून आहे. त्यामुळे या पाण्यावर आपलाच हक्क असावा असा पाकिस्तानचा नेहमीच अट्टाहास होता पण आता जर त्यांचे पाणी बंद झाले तर त्यांची पंचाईत होणार आहे.
जोवर पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देईल तोवर सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती हा भारत सरकारचा निर्णय कायम असेल.
भगवान दातार यांच्या पोस्टवरून साभार