वेद आणि धर्मग्रंथांसह संगणक आणि विज्ञानाचा अभ्यास

Vartapatra    24-Apr-2025
Total Views |

sanskrutik-vartapatra hindu-sanskruti_udupi-suguna-school-vedic.jpg 
इथे सकाळची सुरुवात वैदिक मंत्रांच्या पठणाने होते... दुपारी ते संगणकाचा अभ्यास करतात आणि विज्ञान आणि गणिताचे प्रश्न सोडवतात... पहिली ते आठवीपर्यंत शिकणारे हे विद्यार्थी पौरोहित्य करिअर करण्यासाठी आले आहेत. कर्नाटकातील उडुपी शहरातील श्री पुथिगे सुगुणा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी, संस्कृत आणि कन्नड या तीन भाषा बोलता, लिहिता, वाचता येतात. या उडुपी पुथीगे मठाचे प्रशासक प.पू. सुगुणेंद्र तीर्थ पर्याय स्वामीजी म्हणतात – 'अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीय देशांमध्ये हिंदू लोकसंख्या वाढत आहे. मंदिरांची संख्याही वाढली आहे. मात्र पुजारी आणि शिक्षकांची कमतरता आहे. या देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय त्यांच्या मुळाशी आणि संस्कृतीशी जोडलेले राहावेत यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना तयार करत आहोत.'

समाजासाठी शिक्षण...
पुजारी बनण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना अनुष्ठान कर्तव्य आणि नैतिकतेचे शिक्षण दिले जाते. त्यांना प्राण्यांबद्दल सहानुभूती आणि ज्येष्ठांचा आदर शिकवला जातो. मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्परावलंबन आणि शिस्तबद्ध, चिंतनशील जीवनशैलीच्या वैदिक दृष्टिकोनाचीही ओळख होते. मठाचे गुरु प्रसन्नाचार्य म्हणतात - सध्या येथील सर्व विद्यार्थी ब्राह्मण समाजातील आहेत, परंतु आम्हाला आशा आहे की येणा-या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जातीचे व गटाचे विद्यार्थी येथे येतील आणि ज्ञान आणि विज्ञानाबरोबरच पुजारी बनण्याचे प्रशिक्षण घेतील. ९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या शाळेत गेल्या २ वर्षांपासून जागतिक आणि धर्मनिरपेक्ष असे एकत्रित शिक्षण दिले जात आहे.

दैनिक भास्कर २१/०४/२५