
श्रमदानातून पाइपलाइन
पाण्याच्या कमतरतेअभावी आई भवानी डोंगर परिसरातील वृक्षारोपण थांबवावे की काय, असा देखील विचार 'वनप्रस्थ फाउंडेशन'च्या स्वयंसेवकांच्या मनामध्ये येत होता. अशावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विभागीय सहकारी दूध संघाच्या डेअरीमधून वनप्रस्थच्या झाडांना पाण्याची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र या ठिकाणाहून सुमारे एक किलोमीटर एवढे अंतरावर पाणी घेऊन जाणे हे देखील एक मोठे दिव्य होते. अशावेळी 'वनप्रस्थ' चे कार्यकर्ते संतोष शेलार यांच्या माध्यमातून फिडेल मोटरचे संचालक दीपक बजाज यांनी निंबस पाईप्स यांच्या माध्यमातून सुमारे एक किलोमीटर अंतराँची पाइपलाइन आणि विद्युत मोटर संस्थेला उपलब्ध करून दिली. कार्यकत्यांनी श्रमदानातून एक किलोमीटर अंतराची पाइपलाइन करीत हे पाणी आई भवानी डोंगरावर थेट मंदिरापर्यंत नेले. आता उष्णतेच्या वातावरणातही झाडे बहरली आहेत.
१७,५०० रोपांचा पालकआई भवानी डोंगरावरील वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाच्या कार्याबरोबरच सिन्नर शहरात देखील वीर सावरकर नगर सरदवाडी रोड बायपास जवळ नगर परिषदेच्या सहकायनि नगरपालिकेच्या मोकळ्या मैदानात सुमारे ११०० वृक्ष रोपांची देवराई तयार केली. त्याचबरोबर सिन्नर कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या गोजरे मळा येथे ९०० रोपांची दुसरी देवराई उभारण्याचे कामकाज करण्यात आले. मुक्तेश्वरनगर येथे रोटरी क्लब ऑफ नाशिक ट्रस्ट यांचे सहकायनि २५०० वृक्षारोपांचे 'पॉकेट फॉरेस्ट' उभारण्यात आले आहे. 'रिंग प्लस अक्वा' आणि 'स्टाइस' मुसळगाव एमआयडीसी यांचे सहकायनि मुसळगाव येथे सुमारे ४५०० रोपांचे घनवन प्रकल्प उभारण्यात आला. या विविध उपक्रमातून वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी १७,५०० वृक्षरोपांचा टप्पा ओलांडला आहे. या रोपांचे संवर्धनाचे कार्य दररोज सकाळी ६ ते ८
यावेळात श्रमदान करत असून एकप्रकारे धरणीमातेची कूस भरण्याचे कार्य 'वनप्रस्थ फाउंडेशन'चे स्वयंसेवक करत आहेत.
सकाळ २३.३.२५