वसईत पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध

Vartapatra    25-Apr-2025
Total Views |
 
sanskrutik-vartapatra-dahashatvad_bjp-protest-against-pakistan-flag-burnt-in-vasai-railway-station
 
वसई (जिल्हा पालघर) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच पाकविरोधी घोषणा दिल्या. वसई रेल्वेस्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, आतंकवादाचा नाश होवो’ अशाही घोषणा दिल्या.

काश्मीरमध्ये वाढलेले पर्यटन पाकिस्तानला पहावले नाही ! – उत्तम कुमार, भाजप महाराष्ट्र प्रदेश, केरळ प्रकोष्ट संयोजक


काश्मीरमध्ये वाढलेले पर्यटन पाकिस्तानला पहावले नाही. आपले सैनिक बलिदान देत आहेत आणि पाकिस्तान आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहे. पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. देशात राहून देशविरोधी कटकारस्थान रचणाऱ्या काही राजकीय टोळ्यांचा प्रथम बंदोबस्त करणे आवश्यक आहे. आतंकवादाविरोधात सरकार कठोर पावले उचलते, तेव्हा रॉबर्ट वाड्रा यांसारख्या लोकांना ‘मानवाधिकार’ आणि ‘अल्पसंख्यांक’ आठवतात.



सनातन प्रभात २४.४.२५