हरित तुरुंग

Vartapatra    26-Apr-2025
Total Views |

anskrutik-vartapatra anya_Green Jail .jpg 
छत्तीसगडमधील विलासपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात २०२४ सालच्या जून महिन्यापासून पासून ' हरित तुरुंग ' मोहीम सुरू करण्यात आली आहे. तुरुंग पॉलिथिनमुक्त करण्यासाठी ४ हजार पयार्वरणपूरक -विटा तयार करण्यात आल्या आहेत. कचऱ्यापासून बायोगॅस आणि वर्मी कंपोस्ट तयार करणे, झाडे लावणे आणि वीज आणि पाण्याची बचत करणे अशी चांगली पाऊले उचलली जात आहेत . कैद्यांना पयार्वरणपूरक -विटा तसेच बायोएंझाइम बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
सौरऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि पाण्याची बचत यासारख्या उपायांचाही वापर केला जात आहे. दररोज १ लाख १५ हजार लिटरहून अधिक पाण्याची बचत होत आहे. याशिवाय ३२ जलस्रोत बांधून पाण्याचा भूगर्भात साठवणूक करण्यात येत आहे.
 
 
पाथेय कण, १-१६ एप्रिल २५