प्रयागराज इथे महाकुंभमेळा सुरू असताना वाराणसी इथे दुसरा एक नऊ दिवसीय सांस्कृतिक मेळा संपन्न झाला. काशी-तमिळ संगमम असे त्याचे नाव. उत्तर आणि दक्षिणेत सांस्कृतिक आणि बौद्धिक संबंध मजबूत होण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या उत्सवाचे हे तिसरे वर्ष. १००० जण यात सहभागी झाले होते.बनारस हिंदू विद्यापीठ आणि आय.आय.टी.मद्रास यांनी संयुक्तपणे आयोजनाची जबाबदारी पार पाडली.
सिद्ध चिकित्सा पद्धती, शास्त्रीय तमिळ साहित्यात अगस्त्य ऋषींचे योगदान आणि राष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेत त्यांचे योगदान हा यावेळी मुख्य विषय होता. अगस्त्य ऋषींच्या जीवनावर सेमिनार, कार्यशाळा , पुस्तक प्रकाशन आणि चित्रप्रदर्शन हेही या संगमममध्ये होते.
स्टार्ट अप उद्योगांचे स्टॉल्स होते.पुस्तकप्रदर्शन तसेच पोस्टर, पेंटींग, कथा लेखन आणि प्रश्नमंजूषा याचाही समावेश या उत्सवात होता.
अवध प्रहरी, १ ते १५ मार्च २५